हैदराबाद :– तेलुगु-हिंदी सिनेमातील दिग्दर्शक के. विश्वनाथ यांचे शुक्रवारी निधन झाले. ते 92 वर्षांचे होते; त्यांच्यावर येथील रुग्णालयात दीर्घकाळ उपचार चालू होते. पाच वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेत्या विश्वनाथ यांच्या निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
के. विश्वनाथ यांनी अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. ज्यामध्ये ईश्वर, संजोग, सूर सरगम, कामचोर, जाग उठा इंसान, संगीत या हिंदी चित्रपटांचा समावेश होता. त्यांनी दिग्दर्शित केलेले हिंदी चित्रपट त्यांच्या तेलुगू चित्रपटांचे रिमेक असायचे.
“यारादी नी मोहिनी’, “राजापट्टाई’, “लिंगा’ आणि “उत्तमा व्हिलन’ यांसारख्या तमिळ चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका देखील केली होती.
1965 मध्ये विश्वनाथ यांनी तेलुगू चित्रपट “आत्मा गोवरवम’द्वारे दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले. त्याला सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मचा नंदी पुरस्कार मिळाला होता.
Assembly by-elections : पोटनिवडणूकीबदल जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले “महाविकास आघाडी….”
विश्वनाथ यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च सन्मान दादासाहेब फाळके पुरस्काराने (2016) देखील सन्मानित करण्यात आले होते. त्यानंतर 1992 मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कारही बहाल करण्यात आला होता.