मुंबई : गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने ब्रिच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टारांनी सांगितले. रविवारी रात्री दीडच्या सुमारास त्यांना ब्रिच कॅंडी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांच्यावर डॉ. फारूक उदवाडीया यांच्या नेतृत्वाखालील पथक उपचार करत आहे.
Team of Lata Mangeshkar: Lata Mangeshkar had chest infection so she was taken to Breach Candy Hospital, Mumbai today. She is now back at her home and is recovering. (file pic) pic.twitter.com/pYzmZHkthz
— ANI (@ANI) November 11, 2019
दोनदिवसांपुर्वी त्यांची भाची पद्मिनी कोल्हापुर यांचा फोटो ट्विट केला होता. हा फोटो आशुतोष गोवारीकर यांच्या पानिपत या चित्रपटातील होता. त्यांनी या ट्विटद्वारे पानिपतच्या टीमला शुभेच्छा दिल्या होत्या. 28 सप्टेंबर रोजी लतादीदींनी वयाची नव्वदी पार केली होती. माधुरी दीक्षीत, अनिल कपूर, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल यांनी त्यांना लवकर बऱ्या होण्यासाठी समाज माध्यमांवर शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, त्यांच्या भगिनी आशा भोसले यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून त्यांना सायंकाळ किंवा उद्या सकाळी घरी सोडण्यात येईल.