नवी दिल्ली – एफआयएच महिला विश्वकरंडक हॉकी स्पर्धेसाठी भारताच्या महिला संघाचे नेतृत्व अनुभवी सविताकडे सोपवण्यात आले आहे. नियमित कर्णधार राणी रामपाल दुखापतीमुळे या स्पर्धेत खेळू शकणार नसल्याने हॉकी इंडियाने हा निर्णय घेतला आहे. दीप ग्रेस एक्का हिच्याकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
भारतीय महिला हॉकी संघ – सविता (कर्णधार), बिछू देवी खारिबाम, दिप ग्रेस एक्का (उपकर्णधार), गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता, निशा, सुशिला चानू पुखरम्बाम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सोनिका, सलिमा टेटे,वंदना कटारिया, लालरेम्सियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी. राखीव खेळाडू – अक्षता ढेकळे, संगीता कुमारी.