मुरलीधर शिंगोटे यांचे निधन

पुणे:  पुण्यनगरी वृत्तपत्र समूहाचे संस्थापक-संपादक मुरलीधर अनंता शिंगोटे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 82 वर्षांचे होते. गायमुखवाडी (ता. जुन्नर) येथे राहत्या घरी गुरुवारी (दि. 6) दुपारी एकच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला.

7 मार्च 1938 रोजी जुन्नर तालुक्‍यातीलच उंब्रज नं. 1 या गावी त्यांचा जन्म झाला. घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी नोकरी-व्यवसायासाठी मुंबई गाठली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी मुंबईतल्या फाउंटन परिसरात आंदोलन झाले होते, त्याचे शिंगोटे साक्षीदार राहिले. याच परिसरात सुरुवातीला फळ विक्री, त्यानंतर बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र टाकण्याचे काम सुरू केले. हे करीत असताना त्यांनी 1994 मध्ये एक सायं दैनिक सुरू केले. इतर भाषेतील दैनिके सुरू करताना दैनिक पुण्यनगरीची मुहूर्तमेढ 1999 मध्ये रोवली. त्यांच्या पश्‍चात पत्नी, तीन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.