ज्येष्ठ नाट्यकर्मी राम जाधव यांची एक्‍झीट

अकोला – अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ रंगकर्मी राम जाधव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. नवी दिल्लीतील एका खासगी रुग्णालयात आज सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांनी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला.

2011मध्ये रत्नागिरी येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मृत्यूसमयी त्यांचं वय 86 वर्ष होते. नाट्य आणि कलावर्तुळात राम जाधव “मामा’ नावाने प्रसिद्ध होते. मामांचे हौशी रंगभूमीसाठी मोठे योगदान आहे. मामांनी अकोल्यात 60 वर्षांपूर्वी स्थापन केलेल्या “रसिकाश्रय’ संस्थेच्या माध्यमातून अनेक कलावत आणि नाटकं रंगभूमीला दिली. ल्रसिकाश्रय’ ही महाराष्ट्रातील सर्वात जुन्या नाट्य संस्थांपैकी एक आहे.

राम जाधव गेल्या सात दशकांपासून रंगभूमीशी जुळल्या गेले. अगदी लहानपणापासूनच राम जाधव यांनी रंगभूमीवर प्रवेश केला. लहान-मोठ्या भूमिका साकारत त्यांनी आपली चुणूक दाखविली. पुढे महाविद्यालयीन जीवनात देखील त्यांनी अनेक भूमिका साकारल्यात. नंतरच्या काळात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्यच रंगभूमीच्या चरणी बहाल केले.

रेल्वेमध्ये तिकीट कलेक्‍टरची नोकरी करीत असताना दुसरीकडे रंगभूमीवर मामांच्या विविध भूमिका वठविणे सुरूच होते. राम जाधव म्हणजे मराठी नाट्यक्षेत्रातील हौशी रंगभूमीवरचं एक भारदस्त नाव. थोडे थोडके नव्हे तब्बल 50 वर्षे हे नाव राज्य नाट्यस्पर्धांमध्ये सातत्याने गाजत राहिले. मामांनी अभिनयासोबतच, दिग्दर्शन, निर्माता म्हणून देखील आपली छाप पाडली.

मामांच्या कार्याची दखत घेत राज्यशासनासह विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन गौरविले. मामांनी नाट्यनिर्माते सातत्याने 150 वर नाटकांची निर्मिती राम जाधव यांनी केली होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.