मुंबई – मनोरंजन क्षेत्रातून एक धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेते अरुण बाली यांचे निधन झाले आहे. ७९ वर्षीय अरुण बाली यांनी मुंबईत अखेरचा श्वास घेतला. ते अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे बोलले जात आहे.
Veteran actor Arun Bali passes away at the age of 79 years in Mumbai
— ANI (@ANI) October 7, 2022
अरुण बाली हे अनेक दिवसांपासून आजारी होते.अरुण बाली यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अरुण बाली हे मायस्थेनिया ग्रॅव्हिस या दुर्मिळ आजाराशी झुंज देत होते. मायस्थेनिया ग्रॅव्हिस हा स्वयंप्रतिकार रोग आहे. हा रोग नसा आणि स्नायू यांच्यातील संवादाच्या बिघाडामुळे होतो.
अरुण बाली हे इंडस्ट्रीतील अनुभवी कलाकार होते, ज्यांच्या जाण्याने प्रत्येकजण भावूक झाले आहे. अरुण बाली यांच्या निधनाच्या वृत्ताने मनोरंजन क्षेत्रात शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्याच्या निधनावर अनेक सेलिब्रिटींनी शोक व्यक्त केला आहे.
वर्षाच्या सुरुवातीला टीव्ही अभिनेत्री नुपूर अलंकारने एका मुलाखतीत अरुण बालीच्या आजारपणाची माहिती दिली होती. नुपूर त्या वेळी CINTAA चीही सदस्य होती. नुपूरने त्यांच्या विषयी बोलताना सांगितले की, ‘आपल्या सहकलाकाराची बिघडलेली प्रकृती पाहून नुपूरने त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला दिला होता. यानंतर अरुण बाली यांच्या मुलीनेही त्यांच्या आजाराविषयी बोलताना सांगितले की, त्यांना ऑटोइम्यून आजार झाला आहे.’