अबुजा: आज पर्यंत आपण चित्रपटात किंवा गोष्टीत ऐकले आहे कि, कैद्यांना सोडवण्यासाठी तुरुंगवार हल्ला करण्यात आला. पण हे प्रत्यक्षात देखील घडू शकते. होय, तुमचा विश्वास बसणार नाही पण असं घडले आहे ते नायजेरियाच्या एका तुरुंगात. नायजेरियाच्या एका तुरुंगात ज्यात एका टोळीने तब्बल 800 कैद्यांची सुटा केली आहे.
नायजेरियातील अबुजा येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नायजेरियाच्या ओयो प्रांतात दरोडेखोरांच्या एका टोळीने तुरुंगावर हल्ला करुन आपल्या 800 साथीदारांची सुटका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी नायजेरिया कारागृहाच्या बाहेर मोठ्या संख्येने बंदूकधारी जमा झाले. यानंतर त्यांनी कारागृहावर गोळीबार सुरू केला.
कारागृहाच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांनी प्रत्युत्तर दिले, पण ते बंदूकधारी टोळीचा जास्त सामना करू शकले नाहीत. यानंतर डाकूंनी डायनामाइटने तुरुंगाची भिंत उडवली.
कारागृहाची भिंत उडवल्यानंतर दरोडेखोरांनी बंदुका घेऊन तुरुंगात प्रवेश केला आणि त्यांच्या साथीदारांची सुटका केली. कारागृहाची भिंत फोडल्यानंतर 834 कैदी कारागृहातून पळून गेले. मात्र, पोलिसांनी मोहीम राबवून 262 पळून गेलेल्या कैद्यांना पुन्हा ताब्यात घेतले असून 575 कैद्यांचा शोध सुरू आहे. सध्या सर्व फरार कैद्यांचा शोध सुरू आहे.
उल्लेखनीय म्हणजे, डाकू सतत त्यांच्या साथीदारांना सोडवण्यासाठी तुरुंगांना लक्ष्य करत आहेत. ओयो प्रांतातील कारागृहावरील हल्ला हा या कारागृहावरील तिसरा मोठा हल्ला आहे. या वर्षी एप्रिलमध्ये डाकुंनी इमो प्रांतातील तुरुंगावर हल्ला करून 1,800 कैद्यांची सुटका केली होती. याशिवाय गेल्या महिन्यात कोगी प्रांतातील दरोडेखोर तुरुंगावर हल्ला करून 266 कैद्यांची सुटका केली होती.