fbpx

वेण्णा लेक आजपासून नौकाविहारासाठी खुला

पाचगणी -जिल्हाधिकाऱ्यांनी वेण्णा लेक सुरु करण्याचा आदेश दिले आहेत. महाबळेश्‍वरचे मुख्य आकर्षण व पर्यटकांच्या हक्काचे ठिकाण वेण्णा लेकमधील नौकाविहार येत्या उद्यापासून (दि. 21) खुला होणार असून मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक कुमार शिंदे यांनी वेण्णा लेक परिसराची पाहणी केली.

प्रशासनाने “मिशन बिगेन अगेन’अंतर्गत सवलती दिल्याने महाबळेश्‍वरकडे पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. मात्र, वेण्णा तलाव नौकाविहारासाठी बंदच होता. पालिकेच्या उत्पनाचे मुख्य स्रोत अशी वेण्णालेकची ओळख. करोनामुळे आठ महिन्यांहून अधिक काळ वेण्णालेक बंद असल्याने पालिकेच्या उत्पन्नावरदेखील मोठा परिणाम झाला होता.

या परिसरात मका कणीस, स्ट्रॉबेरी, गाजर,चप्पल विक्रेते, फोटोग्राफर्स, छोटे स्टॉलधारक व्यावसायिक अडचणीत आले होते. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी वेण्णालेक नौकाविहारास नुकतीच परवानगी दिली असून मार्गदर्शक सूचनाही जारी केल्या आहेत. शासनाच्या सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून पर्यटक, बोटमन आदींची काळजी घेऊनच उद्यापासून वेण्णा लेक नौकाविहारासाठी खुला करण्यात येणार आहे.

मुख्याधिकारी पल्लवी पाटील, नगरसेवक कुमार शिंदे यांनी वेण्णालेक येथे भेट देऊन पाहणी केली. स्वच्छता, सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना राबविण्यासंदर्भात अधिकारी व बोट क्‍लबच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी सूचना दिल्या. यावेळी पालिकेचे मुख्य लिपिक आबाजी ढोबळे, शरद मस्के आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.