संडे-स्पेशल: व्हेनिस कार्निव्हल

अशोक सुतार
व्हेनिस कार्निव्हल हा जगप्रसिद्ध महोत्सव इटलीतील व्हेनिस शहरात सुमारे 926 वर्षांपासून दरवर्षी फेब्रुवारी महिन्यात साजरा केला जातो. नवीन पिढीला इतिहासाची ओळख करून देणे, परंपरा व संस्कृती जपणे हा या महोत्सवाचा हेतू आहे. या महोत्सवावेळी 13 ते 18 व्या शतकातील पारंपरिक मुखवटे आणि पोशाख परिधान केले जातात. 20 दिवस खाण्यापिण्याची रेलचेल, विविध मनोरंजक कार्यक्रम व स्पर्धा घेतल्या जातात. पारंपरिक पोशाख आणि रंगीबेरंगी मुखवटे परिधान करून सर्वजण उत्सवात सामील होतात. शेवटच्या दोन आठवड्यांत महत्त्वाचे कार्यक्रम घेतले जातात.
व्हेनिस कार्निव्हलसाठी जगभरातून दरवर्षी सुमारे दहा लाख लोक येतात. 2020 सालचा व्हेनिस कार्निव्हल 8 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

हा उत्सव लेंट सुरू होण्यापूर्वी होतो. लेंट म्हणजे हा उपवास आणि बलिदानाचा काळ आहे. ईस्टरच्या आधी चाळीस दिवसांपर्यंत सर्व शारीरिक सुखांचा त्याग, उपवास केला जातो. व्हेनिस कार्निव्हल हा वार्षिक प्री-लेंटेन उत्सव आहे. यात मास्क, परेड, ऐतिहासिक वेशभूषा, स्ट्रीट पार्ट्या इत्यादी कार्यक्रमांची रेलचेल असते. व्हेनिस कार्निव्हलमध्ये शेकडो वर्षांपूर्वीची व्हेनेशियन लोकांची संस्कृती अनुभवता येते. व्हेनिस कार्निव्हलबद्दलचा पहिला उल्लेख सन 1094 पासूनचा आहे. डोगेविटा लेफ्लेरो यांनी स्वाक्षरी केलेल्या दस्तऐवजात कार्नेव्हले (मांसापासून दूर राहणे) या शब्दाचा उल्लेख केला होता. त्या दिवसांत कार्निव्हल म्हणजे दररोजच्या जीवनातून सुटका होणे, उपवास करणे असा अर्थ होतो. लोकांनी हमी दिलेला मुखवटा घालून अज्ञातवासातून बाहेर येण्याचा हा उत्सव आहे. जेव्हा ऑस्ट्रेलियातील पॅटरियार्कचा पराभव झाल्यानंतर हा उत्सव दरवर्षी होऊ लागला.

त्याने युद्ध करून व्हेनिस शहराला जर्मन साम्राज्यात आणण्याचा प्रयत्न केल्यानंतर व्हेनिसियन लोकांनी मुखवटे परिधान केले आणि लढाई जिंकले. तेव्हापासून हा उत्सव सुरू झाला. 1797 मध्ये नेपोलियन आणि त्याच्या सैन्याने व्हेनिसवर आक्रमण केले तेव्हा त्यांनी व्हेनिस कार्निव्हलवर बंदी घातली. तरीही काही स्थानिक लोकांनी व्हेनिस कार्निव्हलचे पुनरुज्जीवन केले. कार्निव्हलवर एकूण 200 वर्षांहून अधिक काळ बंदी होती.

व्हेनिस कार्निव्हल म्हणजे उर्जा, उत्साह, वेड, जादू, आकर्षण आणि आनंदोत्सव आहे. लोक या काळात शहराभोवती फिरतात, मुखवटा घातलेल्या पात्रांना अभिवादन करतात. स्वत: वेषभूषा करून कार्निवलचा एक भाग होतात. व्हेनिस कार्निव्हलचे केंद्र सेंटमार्क स्क्वेअर येथे असून येथे फ्लाइट ऑफ द ईगल आणि फेस्टाडेले मेरी हे सर्वात लोकप्रिय कार्यक्रम सादर केले जातात. मुखवटे परिधान करून लोक आपसांत भेद न करता संवाद साधतात. सर्वांना समानता मिळवून देणारा व्हेनिस कार्निव्हल उत्सव त्यामुळेच उदात्त आणि भव्य वाटतो.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)