मनी पॉवरच्या वापरामुळे वेल्लोरची निवडणूक रद्द

नवी दिल्ली  – निवडणूक आयोगाने मंगळवारी तामीळनाडूच्या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक मनी पॉवरच्या वापरामुळे रद्द केली. तो मतदारसंघ दुसऱ्या टप्प्यातील (18 एप्रिल) मतदानाला सामोरा जाणार होता. द्रमुकचे उमेदवार काथीर आनंद यांच्याशी संबंधित ठिकाणांवर मोठी रोकड सापडल्याने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्राप्तिकर विभागाने 30 मार्चला आनंद यांचे वडील दुराई मुरूगन यांच्या निवासस्थानी छापा टाकला. त्यावेळी 10 लाखांहून अधिक रकमेची बेहिशेबी रोकड आढळली. त्यानंतर दोन दिवसांनी आनंद यांच्या निकटवर्तीयाच्या सिमेंट गोडाऊनमधून तब्बल 11 कोटी 53 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या अहवालाच्या आधारे स्थानिक पोलिसांनी आनंद यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. त्याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने पुढील पाऊल उचलले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.