वेल्हे – करोनाचे हॉटस्पॉट ठरलेले वेल्हे तालुक्यातील वडगाव झांजे या गावातील 23 करोनाबाधितांपैकी 18 जणांनी करोनावर मात घरीत पसरले असून आता फक्त 5 जणांवर उपचार सुरू आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका करोनामुक्तीकडे वाटचाल करीत आहे.
तालुक्यात आजपर्यंत 32 करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. यात 2 मृत्यू तर 22 जण करोनामुक्त झाले आहे. सध्या तालुक्यातील केवळ 5 रुग्णांवर पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. वडगाव झांजेमधील 15बाधित रुग्णांपैकी पाचजणांना (दि. 25) रात्री तर उर्वरित पाचजणांना (दि. 26) घरी सोडले आहे.
दरम्यान, एकाच कुटुंबातील 36 व 32 वर्षीय दाम्पत्य (दि.23) पॉझिटिव्ह निघाल्याने त्यांना नवले हॉस्पिटलमध्येच दाखल केले आहे. त्यांच्या संपर्कातील 6 जणांना (दि.24) तपासणीसाठी पुणे येथे पाठविले होते. त्यापैकी बाधित व्यक्तीचे वडील, आई व एक मुलगी, असे तिघेही पॉझिटिव्ह आढळले होते. उर्वरित तिघांचे अहवाल निगेटिव्ह आले होते. बाधितांच्या संपर्कातील आणखी 12 जणांना तपासणीसाठी पुण्याला पाठवले होते. त्यांचे अहवाल (दि.27) निगेटिव्ह आला आहे.