वाहनांची ‘पीयूसी’ प्रक्रिया यापुढे ऑनलाइन

केंद्रीय परिवहन विभागाकडून आदेश जारी

पुणे – आतापर्यंत वाहनांची “मॅन्युअली’ करण्यात येणारी “पोल्युशन अंडर कंट्रोल’ प्रमाणपत्र अर्थात “पीयूसी’ प्रक्रिया ऑनलाइन घेण्यात आहे. नव्या प्रक्रियेनुसार हे प्रमाणपत्र देण्यात आलेल्या वाहनांची नोंद परिवहन विभागाकडे राहणार असून वाहनांचे छायाचित्र देखील यामध्ये “अपलोड’ करावे लागणार आहे.

शहरातील वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये जुन्या वाहनांची संख्या अधिक असून वाहनांतील धुरामुळे प्रदूषण होण्याचे प्रमाण वाढत आहे. या चाचणीमुळे वाहनांतील कार्बन मोनॉक्‍साईड, हायड्रोकार्बनचे प्रमाण तपासले जाते. याचबरोबर धुरापासून होणाऱ्या प्रदूषण पातळीच्या नियंत्रणाची चाचणी घेण्यात येते. वाहनांनी या पद्धतीची चाचणी न करणाऱ्या वाहनचालकांना दंड देखील आकारण्यात येतो. या पार्श्‍वभूमीवर केंद्रीय परिवहन विभागाकडून वाहनांची ई-पीयूसी करण्याबाबत आदेश देण्यात आले होते. या आदेशानुसार शहरामध्य लवकरच इलेक्‍ट्रॉनिक पद्धतीने “पीयूसी’ चाचणी करण्यात येणार आहे.

या संदर्भात शहरातील सुमारे 250 “पीयूसी’ केंद्र संचालकांची बैठक घेण्यात येणार आहे. सध्या या केंद्राच्या माध्यमातून मॅन्युअली काम केले जाते. नव्या निर्णयामुळे ई-उपकरणे बसवून घ्यावी लागणार आहे. यासाठी शहरातील सर्व केंद्र संचालकांची बैठक बुधवारी प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) येथे आज (गुरूवारी) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये केंद्र चालकांना ई-पीयूसी संदर्भात माहिती देण्यात आहे, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here