लग्नाला आलेल्यांच्या वाहनांचे “वऱ्हाड’ रस्त्यावर

नीरा-बारामती रस्ता :येथील मंगल कार्यालयांकडे तुटपुंजी पार्किंग व्यवस्था असल्याने वऱ्हाडी मंडळी थेट रस्त्यावर वाहने पार्क करीत आहे.

वाघळवाडी – नीरा-बारामती रस्त्यावर जवळपास सात ते आठ मंगल कार्यालये आहेत. मात्र, या मंगल कार्यालयांकडे पार्किंसाठी तुंटपुंजी जागा असल्याने कार्यालयात आलेली वऱ्हाडी मंडळी आपली वाहने थेट रस्त्यावरच बेशिस्तपणे पार्किंग करीत असल्याने लग्नसराईत वाहतूककोंडी नित्याचीच ठरलेली आहे. साखर काखान्यांचा हंगाम सुरू असून या रस्त्यावर दोन साखर कारखाने असल्याने उसाची वाहतूक मोठ्या प्रमाणात
केली जाते.

तसेच या रस्त्यावर शैक्षणिक संकुले, मोठ्या बाजारपेठां असल्याने रस्त्यावर कायमच वर्दळ असते. त्यातच सध्या लग्न तिथी असल्याने या रस्त्यावरील कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात वऱ्हाडी मंडळी येत असतात. मात्र, या कार्यालयांमध्ये होणाऱ्या लग्नसोहळ्यांमुळे रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी डोकेदुखी ठरत आहे. लग्नसराईत होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरिता हॉटेल व कार्यालय मालकांकडून उपाययोजना केली नसल्याचेही सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीवर प्रशासन गप्प कसे असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.