पारनेर – पारनेर तहसील कार्यालयाच्या गेटचे कुलुप तोडून आवारातून जेसीबी व टॅक्टर पळविल्याची घटना गुरूवारी रात्री घडली आहे. पारनेर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शिरूर व श्रीगोंदा तालुक्यातील 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मंडलाधिकारी दत्तात्रय अनिल गंधाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारुती कोळपे, सुरज उर्फ अप्पा पांढरे, महेश संपत बोराडे (रा. हिंगणी ता. श्रीगोंदा), ज्ञानेश्वर उर्फ माऊली विनायक नाजगुने (रा. शिरूर), पांडा गरड या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यात 20 लाख इंडिया कंपनीचा पिवळ्या रंगाचा जेसीबी व 4 लाख एक सोनालिका कंपनीचा डीआय 745 ट्रॅक्टर ट्रॉलीसह पळविण्यात आला आहे.
या पाच जणांनी तहसील कार्यालय आवारात शासकीय कर्तव्य पार पाडीत असताना यातील आरोपींनी जेसीबी मशीन व एक ट्रॅक्टर ट्रॉली सहित एक ब्रास वाळू जप्त करून ठेवली असतांना पळवून नेल्याचा म्हटले आहे. धक्काबुकी करून सरकारी कामात अडथळा आणून तहसिल कार्यालयाची गेटची साखळी तोडून गेटचे नुकसान करून त्यांना करण्यात आलेला दंड न भरता सदर वाहने चोरून नेले आहे.
वाहन पळविल्याच्या घटनांमध्ये वाढ
पारनेर महसूल विभागाच्या वतीने अवैध वाळु उपसा व वाहतुक करीत असलेली वाहने कारवाई करून तहसील कार्यालयात लावण्यात येत आहे. परंतु तहसील कार्यालयाचे गेटचे कुलुप तोडुन वाहन पळविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे वाळु तस्करांनी थेट महसूल व पोलिस प्रशासनाला एकप्रकारे आवाहन दिले आहे.