पुणे – शहरातील हडपसर परिसरातील नवीन म्हाडा कॉलनीमध्ये सोमवरी रात्री दुचाकीवरुन आलेल्या टोळक्यांनी वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. रविवारी (ता.27) येरवडा भागात दुचाकीची तोडफोड केल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच सोमवारी हडपसर परिसरात गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे.त्यामुळे ऐन दिवाळीत नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
मागील काही महिन्यांपासून पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. शहरातील हडपसर परिसरातील नवीन म्हाडा कॉलनीत 5 ते 6 वाहनांची तोडफोड केली आहे. शहरातील विविध भागातील झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन हडपसरच्या म्हाडा कॉलनीत झाले आहे.