पुणे- भारती विद्यापीठ पोलिसांनी वाहन चोरी करणाऱ्या दोघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून चोरीच्या पाच दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
आकाश दगडू थोरास उर्फ समरत (21,रा.शेवाळवाडी, हडपसर, मुळ बीड) व विकी उर्फ विकास दिलीप पवार (24,रा.दत्तवाडी, मुळ-नांदेड) अशी अटक आरोपींची नावे आहेत. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात जांभुळवाडी येथून एक दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल होती. या अनुषंगाने तपास करताना ते चोरी करणारे आरोपी नारायणी धाम येथे येणार असल्याची खबर मिळाली होती. पोलीस कर्मचारी राहुल तांबे व सर्फराज देशमुख यांनी मिळालेल्या खबरीनूसार सापळा रचून दोघांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना बघताच आरोपींनी पळ काढला होता.
मात्र पोलिसांनी पाठलाग करुन त्यांना पकडले. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता, त्यांनी या गुन्हया व्यक्तीरीक्त आणखी गुन्हे केल्याचे कबुल केले. त्यांनी भारती विद्यापीठ आणी कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून पाच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. या दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या असून त्याची किंमत 1 लाख 70 हजार इतकी आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहायक पोलीस आयुक्त सर्जेराव बाबर, पोलीस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भुषण कोते, महेंद्र पाटील व तपास पथकातील कर्मचाऱ्यांनी केली.