ई- पोर्टलमध्ये साठवली जाणार वाहनविषयक माहिती

Madhuvan

नवी दिल्ली – वाहनांची माहिती ऑक्‍टोबरपासून माहिती तंत्रज्ञानाच्या पोर्टलमध्ये साठवली जाणार आहे. यामध्ये वाहनाचा परवाना, ई चलन इत्यादीचा समावेश आहे. इलेक्‍ट्रॉनिक माध्यमातून ज्या कागदपत्राची तपासणी केली जाणार आहे, अशी कागदपत्रे प्रत्यक्ष कागदपत्राच्या स्वरूपात मागितली जाणार नाहीत.

त्यामुळे मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी अधिक सोपी होईल असे रस्ते वाहतूक मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे संबंधित वाहनधारकांना यापूर्वी शिक्षा झाली आहे का, याची माहिती ताबडतोब मिळेल. त्यामुळे बेजबाबदारपणे वाहन चालवण्याच्या पद्धतीला आळा बसेल.

वाहनधारकांना इलेक्‍ट्रॉनिक आणि कागदपत्राच्या स्वरूपात प्रमाणित माहिती मिळेल. जर कागदपत्रांची तपासणी केली असेल तर त्यांनी तपासणी कोणत्या अधिकाऱ्याने केली यांची माहिती पोर्टलवर जमा केले जाईल. त्यामुळे अधिकाऱ्याचे उत्तरदायित्व वाढेल.

यामुळे वाहनधारकांचा छळ कमी होईल असे सांगण्यात आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.