वाहने भाड्याने घेऊन लावली ‘या’ धंद्याला

वाहने भाड्याने घेऊन लावली 'या' धंद्याला लोहगाव येथील टुर व्यवसायीकाचा कारनामा

पुणे- एका टुर व्यवसायीकाने सरकारी अधिकाऱ्यांना गाडी भाड्याने लावण्यासाठी नागरिकांकडून करारनामा करुन गाड्या घेतल्या. मात्र या गाड्या देशी दारूच्या अवैध्य वाहतूकीसाठी वापरण्यात आल्या. त्याने आजवर याप्रकारे सहा जणांची लाखो रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी आणखी काही तक्रारदार पुढे येण्याची शक्‍यता आहे.

श्रीधर मुरलीधर जगताप(30,रा.भोसरी) यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार हैदर अली आलंदार हुसेन सय्यदे(24,रा.लोहगाव) याच्याविरुध्द येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा येरवडा येथे द सिटी ट्रॅव्हल्स नावाने व्यवसाय आहे. त्याने श्रीधर यांची इनोव्हा क्रिस्टा कार करार करुन भाडेतत्तावर घेतली होती. त्याने करारात ठरल्याप्रमाणे भाड्याची रक्कम दिली नाही. तसेच ही गाडी सरकारी अधिकाऱ्याला भाड्याने देणार होता. मात्र ती अवैध्य दारु वाहतूकीसाठी देण्यात आली. श्रीधरने गाडी परत मागितल्यावर त्याला ती देण्यात आली नाही. त्याच्या प्रमाणे इतर पाच जणांचीही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक समीर करपे करत आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.