मुंबई – ऑनलाइन फूड डिलिव्हरीनंतर आता भारतात ऑनलाइन भाजीपाला आणि फळे विकण्यात येणार आहे. भारतातील ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’ने हा निर्णय घेतला आहे. एका प्रसिद्ध वृत्त वाहिनीने संदर्भातील माहिती दिली आहे.
सर्वप्रथम हा प्रोजेक्ट हैद्राबाद येथून सुरुवात होणार आहे. हैद्राबाद मधील हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर लवकरच फ्लिपकार्ट ऑनलाइनद्वारे घरोघरी भाजी आणि फळे विक्री केली जाणार आहे.
काही ठराविक ठिकाणीच अॅमेझॉनकडून फळे आणि भाजीपाल्याची डिलिव्हरी केली जाते. फ्लिपकार्टने ऑनलाइन भाजी विक्री करण्याचा निर्णय ही स्पेस भरून काढण्यासाठीच घेतला आहे.
दरम्यान, आमच्यासाठी सर्वात महत्त्वाचे किराणा सामान असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. तसेच या प्रोजेक्टद्वारे ग्राहकांचा स्वभाव आणि सप्लाय चेन याचा अभ्यास करण्यात येणार असल्याचे फ्लिपकार्टने सांगितले आहे.