पुणे – सलग चार आठवड्यापासून मार्केट यार्डात फळभाज्यांची आवक स्थिर आहे. तरीही मागणी जास्त असल्याने भेंडी, टोमॅटो, काकडी, फ्लॉवर, घेवड्याच्या भावात दहा ते वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. मागणी आणि पुरवठा यातील समतोलामुळे उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत स्थिर आहेत.
रविवारी येथील बाजारात 90 गाड्यांची आवक झाली. परराज्यातून आलेल्या मालामध्ये राजस्थान येथून 13 ते 14 टेम्पो गाजर, गुजराथ आणि कर्नाटक येथून 4 ते 5 टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू येथून 3 ते 4 टेम्पो शेवगा, कर्नाटक, गुजरात येथून 8 ते 10 टेम्पो हिरवी मिरची, राजस्थान आणि मध्यप्रदेश येथून मटार 14 ते 15 ट्रक, मध्यप्रदेश आणि गुजराथ येथून 7 ते 8 ट्रक लसूण, आग्रा, इंदौर आणि स्थानिक परिसरात मिळून बटाट्याची 40 ट्रक इतकी आवक झाली.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले 1500 ते 1600 गोणी, कोबी सुमारे 5 ते 6 टेम्पो, फ्लॉवर 8 ते 10 टेम्पो, भेंडी 5 ते 6 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, सिमला मिरची 10 ते 12 टेम्पो, टोमॅटो 7 ते 8 हजार पेटी, भुईमूग शेंगा 50 ते 60 पोती, तांबडा भोपळा 7 ते 8 टेम्पो, हिरवी मिरची 4 ते 5 टेम्पो, गवार 4 ते 5 टेम्पो, पावटा 3 ते 4 टेम्पो, श्रावणी घेवडा 3 ते 4 टेम्पो, कांदा 70 ते 75 ट्रक इतकी आवक झाली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव :
कांदा : 250-400, बटाटा : 100-140, लसूण : 400-800, आले : सातारी 100-200, भेंडी : 300-400, गवार : 400-500, टोमॅटो : 100-140, दोडका : 250-300, हिरवी मिरची : 250-450, दुधी भोपळा: 80-120, चवळी : 200- 250, काकडी : 180-250, कारली हिरवी 250-300, पांढरी 200-220, पापडी : 250-300, पडवळ: 180-200, प्लॉवर: 100-140, कोबी : 50-60, वांगी : 150-200, डिंगरी : 200-250, नवलकोल: 70-80, ढोबळी मिरची: 150-200, तोंडली : कळी 200-250, जाड, 100-120, शेवगा : 400-450, गाजर 120-150, वालवर 300-350, बीट : 60-80, घेवडा : 400-450, कोहळा : 100-150, आर्वी: 200- 220, घोसावळे : 150-200, ढेमसे: 200-250, भुईमूग शेंग : 400-500, मटार: स्थानिक: 250, परराज्य 200-230, पावटा : 300-400, तांबडा भोपळा : 60-100, सुरण: 180-200, नारळ : शेकडा 1000-1600, मका कणीस : 60-120.