फळभाज्यांपाठोपाठ पुण्याच्या बाजारात पालेभाज्याही स्वस्त!

पुणे – आवकेच्या तुलनेत पालेभाज्यांना उठाव नाही. त्यामुळे सर्वच प्रकारच्या पालेभज्यांचे भाव घाऊक बाजारात घसरले आहेत. किरकोळ बाजारातही पालेभाज्यांच्या जुडीची कमी भावाने विक्री होत आहे. कांदापात वगळता सर्वच पालेभाज्यांच्या जुडीसाठी किरकोळ बाजारात 5 ते 12 रुपये मोजावे लागत आहेत. तर कांदापातच्या जुडीला 5 ते 20 रुपये मोजावे लागत आहेत.

 

रविवारी मार्केट यार्डातील तरकारी विभागात कोथिंबिरीची आवक वाढली आहे. आज पावणेदोन लाख जुडी आवक झाली. जी गेल्या आठवड्याच्या दीड लाख जुडी होती.

 

तर मेथीची आवक मात्र घटली आहे. आज 80 हजार जुडींची आवक झाली. जी गेल्या आठवड्यात दीड लाख जुडी होती, अशी माहिती श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड आडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.

 

पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी)

कोथिंबीर : 100-600, मेथी : 200-500, शेपू : 100-300, कांदापात : 100-1500, चाकवत : 400-500, करडई : 400-500, पुदिना : 300-400, अंबाडी : 500-600, मुळे : 800-1000, राजगिरा : 300-400, चुका : 200-500, चवळई : 200-300, पालक : 400- 500.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.