वेगळे आता शहर शोधायचे आहे

दुःख सारे एकदा पचवायचे आहे
प्रेयसीला सासरी धाडायचे आहे

आपल्या दररोज इच्छा मारुनी जगणे
हे करंटेपण मला रुजवायचे आहे

माहिती आहे मला, म्हणशील ‘नाही’; पण
आजचे कारण नवे ऐकायचे आहे

येथले रस्ते नि गल्ल्या पाठही झाल्या
वेगळे आता शहर शोधायचे आहे

बोट धरतो, चालणे सोबत शिकवतो; त्या
एकदा बापास जग फिरवायचे आहे

प्रेयसी, गझला, चहा, हॉस्टेलची खोली
शेवटी सगळे मला विसरायचे आहे

– शिवम्

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.