परळी : वीरशैव पंचपीठांतील अत्यंत प्राचीन व सुप्रसिद्ध अशा काशीच्या श्री जगद्गुरू विश्वाराध्य ज्ञानसिंहासन महापीठात “श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुला’चा शतमानोत्सव समारंभ विविध धार्मिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी जानेवारी 15 ते 21 फेब्रुवारी 2020 दरम्यान होणार आहे. सर्वांनीच या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींनी परळी येथे आयोजित बैठकीत केले आहे.
काशीपीठातील गुरुकुल हजारो वर्षे प्राचीन असून 1918 साली तत्कालीन पंचपीठाधीश्वर काशीमध्ये आले असताना त्यांनी प्राचीन गुरुकुलाचे “श्री जगद्गुरू विश्वाराध्य गुरुकुल’ असे नामकरण केले. त्या नामकरणाला शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून शतमानोत्सव साजरा करीत आल्याचे त्यांनी सांगितले.
काशी पिठाचे जगदगुरू डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या उपस्थितीत काशी येथे होणाऱ्या गुरूकुल शतमानोत्सोव निमित्त परळी येथिल संत गुरुलिंग स्वामी मठ संस्थान (बेलवाडी) शनिवारी बैठक घेण्यात आली,श्री गुरु ष.ब्र. १०८ नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज सोनपेठकर, श्री गुरु ष.ब्र. १०८ अमृतेश्वर शिवाचार्य महाराज जिंतुरकर व श्री गुरु ष.ब्र. १०८ बालतपस्वी व्यकटअप्पा शिवाचार्य महाराज पिंपळगावकर यांची ही यावेळी उपस्थिती होती.