नवी दिल्ली : भारताविरोधात विरोधात सतत वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत राहणारी पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिक पुन्हा एकदा नेटीझन्सच्या निशाण्यावर आली आहे. वीणा मलिकने आपल्या इन्स्ट्राग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये ती पाकिस्तान झिंदाबाद आणि कश्मीर बनेगा पाकिस्तान अशा घोषणाही देताना दिसत आहे. वीणा मलिकच्या या व्हिडीओनंतर भारतीय यूझर्सनी संताप व्यक्त करत तिचा चांगलाच समाचार घेतला.
View this post on Instagram
#Repost @behtareenpk • • • • • • Kashmir Baneyga Pakistan ?? #VeenaMalik #Pakistan #Kashmir
वीणा मलिकच्या या व्हिडीओनंतर अनेकांनी तिला ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. दूध मांगोगे तो खीर देंगे, कश्मीर मांगोगे तो चीर देंगे, अस कमेंट करत एका युझरने आपला संताप व्यक्त केला आहे. तर दुसऱ्या युझरने तुझे स्वप्न हे स्वप्न राहणार असल्याचे म्हटले आहे. तसेच आणखी एका युझरने कमेंट करत भारताच्याच पैशावर तुझे घर चालत असल्याच म्हणत संताप व्यक्त केला आहे. यापुर्वीही वीणा मलिकने भारताविषयी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.