नवी दिल्ली – लॉकडाऊनमुळे सगळ्यांना आपापल्या घरातच राहावे लागत असल्याने विशेषतः खेळाडूंना नैराश्य येण्याची शक्यता व्यक्त होत असतानाच भारताच्या महिला क्रिकेट संघाची अव्वल खेळाडू वेदा कृष्णमूर्ती हिने सोशल मीडियावर लॉकडाऊन मुव्ह या नावाने एक व्हिडीओ तयार केला असून त्यात तिने घरातच नृत्य करण्याचा आनंद कसा घ्यायचा हे दाखवताना स्वतःच नृत्य केले असून चाहत्यांनी सोशल मीडियावर तिला प्रचंड लाईक्स दिले आहेत.
जागतिक क्रिकेटमध्ये श्रीलंका, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू आपला आनंद मैदानावर व्यक्त करताना अनोख्या नृत्यशैलीचे सादरीकरण करतात हे आपण पाहतो. इथे मात्र, एका भारतीय महिला क्रिकेटपटूने घरात बसून राहण्याचा कंटाळा घालविण्यासाठी केलेले नृत्य चांगलेच गाजत आहे. भारताच्या पुरुष संघाचे युवराज सिंग, हरभजन सिंग, कर्णधार विराट कोहली यांनीही आपल्या नृत्यशैलीने अनेक सामन्यांत चाहत्यांची करमणूक केली आहे. कोहलीने वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेल याच्यासह केलेले नृत्य देखील खूप गाजले होते.
https://www.instagram.com/p/B-0Id4FJQw9/?igshid=1ummcjwkk4kx5
वेदाने तिच्या नृत्याचा व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला व त्याला चाहत्यांनी प्रचंड प्रतिसाद दिला. देशात लॉकडाऊन असल्याने सातत्याने घरातच राहावे लागत असल्याने अनेकांनशा पछाडले आहे. त्यांनी कोणतेही नैराश्य दाखवू नये व मिळालेल्या प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा, असे सांगत वेदाने आपल्या नृत्य कौशल्याचे सादरीकरण केले आहे.