मुंबई – निलंबित पोलीसआधिकारी सचिन वाझे आणि परमवीरसिंह हे इंग्लीशमध्ये बोलत असल्याने ते काय बोलले यातील एकही शब्द समजला नसल्याचा जबाब उपनिरीक्षकाने दिल्याचे विश्वासनीय सूत्रांनी सांगितले. न्या. चंदिवाल यांच्या आयोगापुढे सुनावणीसाठी आले असता परमवीरसिंह आणि वाझे यांच्यात एक तास चर्चा झाल्याचे वृत्त होते. या चर्चेची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग आणि बडतर्फ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांच्यात मंगळवारी झालेल्या चर्चेच्या चौकशीचे आदेश महाराष्ट्र सरकारने दिले आहेत. सोमवारी परमवीर चांदीवाल चौकशी आयोगासमोर हजर झाल्यावर दोघांमध्ये भेट झाली.
परमवीर आणि वाजे हे मुंबईतील खंडणी प्रकरणात सहआरोपी आहेत. जेव्हा एखादा आरोपी न्यायालयीन कोठडीत असतो तेव्हा त्याला कोर्टाच्या परवानगीशिवाय बाहेरच्या लोकांना भेटायची अनुमती नसते. मात्र तरीही त्यांनी भेट घेतली याची चौकशी करण्यासाठी पोलीस आयुक्तांना सांगण्यात आलं आहे, असे गृहमंत्र्यांनी सांगितले होते.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग आणि बडतर्फ सहायक उपनिरीक्षक सचिन वाझे यांनी चांदीवाल कमिशनच्या शेजारी ज्या खोलीत त्यांची कथित गुप्त बैठक घेतली त्या खोलीत एका उपनिरीक्षकासह चार पोलीस उपस्थित होते. मात्र, जेव्हा ते इंग्रजीत बोलत होते तेव्हा दोघांमधील संभाषणातील एकही शब्द समजला नाही, असा दावा बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांनी केला.
परमवीर सिंग यांनी सरकारी वाहन वापरल्याबद्दल गृहमंत्र्यांनीही नाराजी व्यक्त केली. परमवीर ड्युटीवर नाही आणि त्यांच्यावर खूप गंभीर आरोप आहेत. अशा स्थितीत सरकारी वाहनाच्या वापराचीही चौकशी केली जाणार आहे असे गृहमंत्री म्हणाले.