आमदार शशिकांत शिंदेच्या पराभवात वसंतराव मानकुमरे जायंट ‘किलर’

पाचगणी, (सादिक सय्यद) – जिल्हा बँक निवडणुकीत जावळी तालुक्यांतील सोसायटी मंतदार संघातून चुरशीच्या लढतीत ज्ञानदेव रांजणे एका मताने जिंकले. आमदार शशिकांत शिंदे यांच्या पराभवात जायंट किलरची भूमिका वसंतराव मानकुमरे यांनी निभावली.

आमदार शशिकांत शिंदे व ज्ञानदेव राजणे लढत हाय होल्टेज झाली. राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार यांनी लढतीत जातीने लक्ष घालत आमदार शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी जिल्ह्यातील सर्व राष्ट्रवादीच्या आमदार व राजेंना सूचना दिल्या होत्या.

ज्ञानदेव रांजणे यांची समजूत काढून आमदार शशिकांत शिंदे याच्याकरीता प्रयत्नाची पराकाष्ठा करण्याच्या सुचना देऊनही ज्ञानदेव रांजणे यांच्या पाठीशी शेवटच्या काही दिवसांत वसंतराव मानकुमरे यांनी जिल्हा बॅकेची निवडणुक ताब्यात घेतल्याने रांजणे निवडुन आले .

ज्ञानदेव रांजणे यांनी या निवडणुकीची जोरदार तयारी सहा महिन्यांपासून सुरु केली होती . एकेक मताकरीता योग्य नियोजन रांजणे करत असताना . जावळीच्या राजकारणातील वाघ म्हणून ओळख असलेल्या वसंतराव मानकुमरे यांनी शेवटच्या टप्प्यात ज्ञानदेव रांजणे यांना मोलाची साथ केली .

गत दहा वर्षापासुन जावळीच्या सहकारात आमदार शशिकांत शिंदे यांना मोलाची साथ देणाऱ्या वसंतराव मानकुमरे यांच्या घुमजावाने शिंदेच्या पराभवाचा जायंट किलर साधला. जावळीच्या राजकारणात शिवसेनेची चढती कमान मोडून काढत राष्ट्रवादीची ताकद वाढवण्याकरीता आमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी नेते वसंतराव मानकुमरे यांना राष्ट्रवादीच्या गोटात सामिल करुन बेरजेचे राजकारण केले होते. मात्र, वसंतराव मानकुमरे व आमदार शिंदे याचे नेहमी शीतयुद्ध माथाडी राजकारणात सुरुच राहीले. याची मानकुमरे योग्य संधीची वाट पाहात आमदार शिंदे यांचे नामोहरम करण्याची सुवर्णसंधी सोडली नाही . आमदार शशिकांत शिंदे यांनी देखील शेवटपर्यंत प्रयत्न करत ४९ मतापैकी २४ मतांचा पल्ला गाठला. मात्र, आपला सर्वात जुना संवगड्याने साथ न दिल्यामुळे एक मताने का होईना आ. शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला अन् जावळी सोसायटी मतदारसंघातून ज्ञानदेव रांजणे विजयी झाले .

एकीकडे राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते रामराजे, आमदार मकरंद पाटील तसेच भाजपचे आमदार शिवेंद्रराजेंवर आमदार शशिकांत शिंदेंकरीता प्रयत्न करण्याच्या आदेशवजा सूचना दिल्या होत्या. भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी ज्ञानदेव राजणे व वसंतराव मानकुमरे यांना समजवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. मात्र, शेवटच्या काही तासांत मानकुमरे यांच्यामुळे शिंदे यांना यश आले नाही .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.