भोर, (प्रतिनिधी) – किवत (ता.भोर) येथील वसंत बबन मोरे यांची शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामाजिक न्याय विभागाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते भोर येथे मोरे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी पक्षाचे भोर तालुकाध्यक्ष रवींद्र बांदल, मानसिंग धुमाळ, कार्याध्यक्ष संदीप नांगरे, युवक अध्यक्ष गणेश खुटवड, जिल्हा परिषदेच्या परिषदेच्या माजी सभापती वंदना धुमाळ, भोलावडे वि.का.सोसायटीचे चेअरमन चंद्रकांत चंदनशिव, राजेंद्र बाळासाहेबा चंदनशिव, रामचंद्र दिनकर चंदनशिव,
विजय आण्णा चंदनशिव, विठ्ठल शिंदे, रोहिदास जेधे, पार्थ रावळ, अमर सुपेकर, संतोष मोरे, रेश्मा यादव उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ व तालुक्यातील पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष वाढीसाठी काम करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.