बारामती (प्रतिनिधी): बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदासाठी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आदेशानुसार सभापती पदी पारवडी गावाचे वसंत बाबुराव गावडे व उपसभापतीपदी सोनकसवाडी गावाचे जेष्ठनेते दत्तात्रय गणपत सणस यांची निवडीची घोषणा करण्यात आली आहे. हि घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.
यावेळी मावळते सभापती अनिल खलाटे, उपसभापती बाळासाहेब पोमाणे, बारामती तालुका दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप, पंचायत समितीचे प्रभारी सभापती प्रदीप धापटे, पंचायत समिती सभापती निताताई बारवकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरविंद जगताप, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष महावीर वडूजकर निवडणूक,तालुका सोशल मिडियाचे अध्यक्ष सुनिल बनसोडे, निर्णय अधिकारी कुंभार साहेब तसेच इतर कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सदरची निवडणूक ही बिनविरोध होऊन सर्वांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.