11 जणांविरूध्द गुन्हा दाखल, अद्याप अटकेची कारवाई नाही
पालघर : पालघर जिल्ह्यातील वसई तालुक्यातील एका 21 वर्षीय तरूणीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करून तिचा छळ केल्याच्या आरोपावरून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही, असे पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी हेमंत काटकर यांनी सांगितले.
ही युवती वसई तालुक्यातील रणगाव आनि कलम येथील रहिवासी आहे. तिला ताब्यात ठेवून तिच्यावर बलात्कार केला आणि तिचा छळ केला. जुलै 2018 मध्ये यातील एका आरोपीशी या युवतीचे संबंध जुळले. त्यानंतर त्याने अन्य काही जणांसह या युवतीचे अपहरण केले. आरोपींनी तिच्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. यातील एका आरोपीसोबत तिचा विवाह झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
या आरोपींच्या ताब्यात असताना त्यांनी तिच्यावर वारंवार बलात्कार केला. त्यातून तिने एका मुलीला जन्म दिला. हा प्रकार या डिसेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. त्यांतर या युवतीने गुन्हा नोंदवला. तिच्या फिर्यादीनुसार बलात्कार, अपहरण, जबरदस्तीने डांबणे, आणि अन्य गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक केली नाही, असे पोलिसांनी सांगितले.