मुंबई – भीमा-कोरेगाव प्रकरणी अटकेत असलेले 81 वर्षीय कवी वरवरा राव यांना करोनाची लागण झाल्याचे आज स्पष्ट झाले आहे. मुंबईतील जेजे रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
वरवरा राव यांना न्यूरॉलॉजी विभागात दाखल करण्यात आले आहे.
त्यांच्या विविध टेस्ट केल्या जाणार असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून सर्व अवयव योग्य पद्धतीने कार्य करत आहेत. पुढील 2-3 दिवसांत सर्व टेस्ट करण्यात येतील, अशी माहिती जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. रणजित माणकेश्वर यांनी दिली.
दरम्यान, वरवरा राव 81 वर्षांचे आहेत. सोमवारी त्यांनी मुंबईच्या उच्च न्यायालयता तात्पुरत्या जामिनासाठी अर्ज केला होता. तब्येत खालावलेली असल्याने जामीन मिळावा, अशी त्यांची विनंती होती. पण न्यायालयाने हा जामीन अर्ज फेटाळला.