बॉलीवूड अभिनेता वरुण धवन नुकताच आपली गर्लफ्रेंड नताशा दलालशी विवाहबद्ध झाला आहे. लग्नानंतर वरुण आणि नताशा दोघेही एकमेकांना वेळ देताना दिसत आहे. वरुण सध्या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी अरुणाचल प्रदेशला गेला आहे. याच काळात त्याने आपल्या पत्नीसाठी वेळ काढत आनंद लुटला.
View this post on Instagram
यावेळी वरुणने आपल्या लेडी लवसोबत बोट राइडचा आनंद घेतला. वरुणने बोट राइड करताना दोघांचा एक सेल्फी फोटो चाहत्यांशी शेअर केला आहे. तसेच आम्ही हनीमूनवर नसल्याचेही त्याने सांगितले. या फोटोत हे कपल खूपच सुंदर दिसत आहे.
View this post on Instagram
या फोटोत वरुण आपली पत्नी नताशासह बोटीतून प्रवास करताना दिसत आहे. निसर्ग संपन्न असा वातावरणात हे कपल खूपच आनंदी असल्याचे दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला असून यावर असंख्य कमेंटस् येत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वरुण सध्या दिनेश विजान यांच्या “भेडिया’ या हॉरर चित्रपटाच्या कामात व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत कृति सेनन मुख्य भूमिकेत असणार आहे.
View this post on Instagram