बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि श्रद्धा कपूर सध्या त्यांच्या आगामी “स्ट्रीट डान्सर 3 डी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. याचवेळी निर्मात्यांनी चित्रपटाचे “इलिगेल वेपन 2.0′ हे नवीन गाणे प्रदर्शित केले आहे.
यापूर्वी निर्मात्यांनी चित्रपटाच्या ट्रेलर आणि गाण्यांशिवाय अनेक पोस्टर रिलीज केले होते. या नव्या गाण्यात वरुण आणि श्रद्धाच्या डान्स मूव्हज पाहण्यासारख्या आहेत. जॅस्मीन सेंडलस आणि गॅरी संधू यांच्या आवाजात हे गाणे खूप हिट होत आहे.
“इलिगल वेपन 2.0′ या गाण्यामध्ये वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्यासह सलमाना युसुफ खान, धर्मेश येलांडे, राघव जुयाल यासारखे अनेक प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या कथेविषयी सांगायचे झाल्यास भारत आणि पाकिस्तानमधील नर्तकांमध्ये एक स्पर्धा दाखविण्यात आली आहे.
दरम्यान, हा चित्रपट “एबीसीडी’ मालिकेचा तिसरा चित्रपट आहे. रेमो डिसोझा दिग्दर्शित “स्ट्रीट डान्सर 3 डी’ या महिन्यात 24 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. वरुण धवन आणि श्रद्धा कपूर यांच्या व्यतिरिक्त चित्रपटात प्रभुदेवा आणि नोरा फतेही मुख्य भूमिका साकारत आहेत. बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची टक्कर कंगना रनौतच्या “पंगा’ या चित्रपटाशी होणार आहे.