Baby John | बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’ चित्रपटाचा जबरदस्त टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अॅटली दिग्दर्शित ‘जवान’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आता त्याचा हा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. मात्र ‘बेबी जॉन’ चित्रपटाचं दिग्दर्शन अॅटलीने केले नसून तो निर्माता आहे.
टीझरमध्ये वरुण पोलिसांच्या गणवेशात दिसत आहे. त्याच्या हातात एक टेडी बेअर आहे, ज्याला पाहून तो बदला घेण्यासाठी बाहेर पडला असल्याचे दिसत आहे. यातील जॅकी श्रॉफच्या लूकने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या चित्रपटात ते खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहेत. वरुण धवनच्या ‘बेबी जॉन’चे दिग्दर्शन कालीस यांनी केले आहे. यात वरुण व्यतिरिक्त कीर्ती सुरेश, वामिका गब्बी, जॅकी श्रॉफ, राजपाल यादव हे देखील दिसणार आहेत.
हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर 25 डिसेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. ‘बेबी जॉन’ हा तमिळ चित्रपटाचा रिमेक आहे. या चित्रपटासह अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना यांचा ‘पुष्पा 2’ या महिन्यात रिलीज होत आहे. मात्र, हा चित्रपट 5 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.