“स्ट्रीट डन्सर’च्या सेटवर वरुण धवन बेशुद्ध

“स्ट्रीट डान्सर’साठी वरुण धवन कसून मेहनत घेतो आहे. दिवसभर त्याने डान्स प्रॅक्‍टिस करण्याचा सिलसिला सुरू केला आहे. शुटिंगदरम्यानही सातत्याने रिहर्सल करण्यामुळे तो अगदी थकून जातो आहे. सिनेमाचे शुटिंग वेळेवर संपवण्यासाठी तो अजिबात ब्रेक घेत नाही आहे. मंगळवारी अशाच एका डान्स सीक्‍वेन्सच्या शुटिंग दरम्यान त्याला अचानक चक्कर यायला लागली.

सततच्या डान्स प्रॅक्‍टिसमुळे त्याला थकवा येऊन तो सेटवर चक्क बेशुद्ध झाला होता. त्यानंतर सेटवर डॉक्‍टरांना बोलवले गेले. वरुणचे ब्लड प्रेशर अचानक कमी झाल्यामुळे त्याला विश्रांतीची गरज असल्याचे डॉक्‍टरांनी सांगितले. त्यानंतर शुटिंग देखील थांबवले गेले. पण थोडी विश्रांती घेतल्यावर दुसऱ्याच दिवशी वरुण सेटवर आला आणि डबल शिफ्टमध्ये काम करून शुटिंगचे टार्गेट पूर्ण केले.

“स्ट्रीट डान्सर 3’मध्ये वरुण धवनबरोबर श्रद्धा कपूरही असणार आहे अणि हा सिनेमा पुढच्यावर्षी रिलीज होणार आहे. याच शुटिंग दरम्यानचा एक व्हिडीओ श्रद्धा कपूरने ट्‌विटरवर पोस्ट केला होता. त्यामध्ये डान्स प्रॅक्‍टिसच्या सेशनचे मोबाईल शुटिंग होते. इतक्‍या वेगवान स्टेप्स करून आपल्याला दमायला होत असल्याचे श्रद्धाने आपल्य मेसेजमध्ये म्हटले होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)