वरुण धवनने WWE रेसलर शैरलेट फ्लेयरला शिकविला डान्स

बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता वरुण धवन हा आपल्या अभिनय आणि कॉमिक टायमिंगसह परफेक्‍ट डान्सिंगसाठीही ओळखला जातो. वरुणला नुकतेच डब्ल्यूडब्ल्यूई रेसलर शैरलेट फ्लेयरसोबत पाहण्यात आले होते आणि त्यांचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे, ज्यात तो शैरलेटला डान्स शिकविताना दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत शैरलेट फ्लेयरने लिहिले की, हा काही सालसाचा लेसन नाही, तर बॉलिवुडमधील डान्स मूव्स शिकत आहे… मला बॉलिवुडमध्ये काम करण्यासाठी मदत केल्याबद्‌दल थॅंक्‍यू वरुण धवन!’ या ट्‌वीटला उत्तर देत वरुण धवन म्हणाला, “तुला भेटून मला खूप आनंद झाला, शैरलेट. तु खरोखरची क्‍वीन आहे. शैरलेट पहिल्यांदाच स्ट्रीट डान्सरसाठी एका गाण्यावर डान्स करत आहे.’

दरम्यान, वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास वरुण धवन आपल्या आगामी “कुली नंबर 1′ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. यात त्याच्यासोबत सारा अली खान झळकणार आहे. याशिवाय तो रेमो डिसूझाच्या “स्ट्रीट डान्सर 3डी’मध्ये श्रद्धा कपूरसोबत काम करत आहे, जो पुढील वर्षी जानेवारीत प्रदर्शित होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.