दबंग ३ च्या रिलीजसोबत ‘स्ट्रीट डान्सरचा’ ट्रेलर होणार प्रदर्शित

मुंबई – बॉलीवूडचा चुलबूल पांडे अर्थात सलमान खान याचा दबंग 3 हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सलमानचे फॅन्स या चित्रपटाकडे डोळे लावून बसले आहेत. आता सलमानच्या दबंग 3 सोबतच वरूण धवनच्या प्रेक्षकांसाठी देखील एक खुशखबर असणार आहे. वरूण आणि श्रद्धा कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला चित्रपट स्ट्रीट डान्सर 3 डीचा ट्रेलर दबंग 3 चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशीच रिलीज करण्यात येणार आहे.

दरम्यान, चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी टि्वट करत ही माहिती शेअर केली आहे. स्ट्रीट डान्सरचा ट्रेलर डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्यात येणार आहे. 24 जानेवारी 2020 ला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात वरूणसोबतच, श्रद्धा, नोरा फतेही आणि प्रभूदेवा यांच्या भूमिका आहेत. सलमान खानचा दबंग 3 हा चित्रपट 20 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत, सोनाक्षी सिन्हा, सई मांजरेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटातून अभिनेते दिग्दर्शक महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर फिल्मइंडस्ट्रित डेब्यू करणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.