#रक्षाबंधन : वरूण त्याच्या बहिणींना देणार ‘या’ भेटवस्तू ,एेकून तुम्हाला आश्चर्य वाटेल

वरूण धवन त्याच्यापरीने उत्कृष्ट हस्तनिर्मित उत्पादनांचा वापर आणि विक्री वाढावी, यासाठी प्रयत्न करत आहे. हस्तनिर्मित वस्तूच्या उत्पादनांसाठी भारत देश जगभर अोळखला जातो. वरूण दरवर्षी आपल्या बहिणी आणि चुलत भावडांसोबत रक्षाबंधन सण साजरा करतो.

मात्र यावर्षी वरूण काहीतरी वेगळा करणार आहे. त्याचा आगामी सुई धागा-मेड इन इंडिया हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात तो टेलरची भूमिका साकारत आहे. या भूमिकेमुळे त्याला भारतीय कारागीरांव्दारे तयार करण्यात येणाऱ्या शिल्पवस्तू आणि कपड्यामध्ये अधिक रूची निर्माण झाली आहे. त्यामुळे येत्या रक्षाबंधनासाठी वरूणने विशेष हस्तनिर्मित भेटवस्तू (गिफ्ट हॅम्पर) तयार केल्या आहेत, ज्या भारतीय कापड आणि शिल्पापासून बनविण्यात आल्या आहेत. या भेटवस्तू वरूण त्याच्या बहिणींना भेट म्हणून देणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरूण म्हणतो की, ‘दरवर्षी मी काहीतरी वेगळी भेट बहिणांना देण्याचा प्रयत्न करतो, अशी भेट की ती त्यांना आवडेल. भारतीय कला आणि शिल्प यांची सुंदरता अनन्य आहे. सुई-धागा या चित्रपटांदरम्यान मी ‘भारतीय कला आणि शिल्प’ याबाबतीत खूपकाही शिकलो. त्यामुळेच मी बहिणींना हस्तनिर्मित भेटवस्तू देणार आहे.

पुढे तो म्हणाला की, ‘मी माझ्या बहिणींना साडी,स्कार्फ, स्टोल आणि हस्तनिर्मित डायरी अशा भेटवस्तू देणार आहेत. या वस्तूंवर फुलकारी कला, तुसर रेशीम, कंठा आणि एल्पिक काम केलेले आहे. मला आशा आहे की, माझ्या बहिणींना या भेटवस्तू नक्कीच आवडतील, जेवढे मला या भेटवस्तू निवडताना आली’.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)