मि. लेले चित्रपटाची घोषणा होवून एक वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या चित्रपटात वरुण धवन मुख्य भूमिका साकारणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तसेच या चित्रपटाचे दिग्दर्शन शशांक खेतान करणार होते. यापुर्वीही शशांक आणि वरुण यांनी एकत्रित काम केलेले आहे.
हा चित्रपट मार्च-2020पासून रखडला होता. या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर वरुण नाखूश होता. यावर 8 ते 10 महिने कोणतीही चर्चा न झाल्याने तो गुंडाळला गेला असल्याचे सांगण्यात येत होते. परंतु “मि. लेले’ चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. या चित्रपटातून वरुण धवन बाहेर पडला असून त्याच्या जागी विक्की कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे.
तसेच यात कियारा आडवाणी नायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी “लस्ट स्टोरीज’मध्ये कियारा आणि विक्की यांची जोडी झळकली होती. यानंतर ही जोडी पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. सध्या कियारा अडवाणी अनेक प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तिच्याकडे अनेक चित्रपट आहेत. “भुलभुलैया 2′, “जुग जुग जियो’, “कर्रम कुर्रम’नंतर आता “मि. लेले’ची घोषणा करण्यात आली आहे.