मुंबई – बॉलिवूड अभिनेता वरून धवन गर्लफ्रेंड नताशा दलालसोबत मे महिन्यात विवाह बंधनात अडकणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वरुण त्याच्या प्रोफेशनल लाईफ इतकाच पर्सनल लाईफला घेऊन देखील चर्चेत आहे. त्यामुळे आता लवकरच वरून बोहल्यावर चढणार आहे.
View this post on Instagram
Let there be snow ☃️?wishing everyone out there a very happy new year 2020
प्रियांका चोप्रा आणि निक जोनासच्या लग्नाचे नियोजन ज्यांनी केले होते. त्यांच्याकडेच वरुणच्या लग्नाच्या नियोजनाचीही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. वरुण आणि नताशाचा विवाह सोहळा आठवडाभर चालणार असून, हे एक ग्रँड लग्न असणार आहे.
वरुणच्या लग्नात सिद्धार्थ मल्होत्रा, जॉन अब्राहम, करण जोहर, अनिल कपूर, बोनी कपूर, अर्जुन कपूर, रणवीर सिंग आणि सलमान खान यासारखे बॉलिवूड सितारे उपस्थित राहणार आहे. दरम्यान, वरुण आणि नताशाच्या कुटुंबीयांनी दोघांच्या लग्नाचा मुहूर्त सिक्रेट ठेवला आहे.