असं म्हटलं जातं की, आरोग्यदायी खाणं जितकं महत्वाचं आहे, तितकच आरोग्यदायी पेयपान करणं देखील महत्वाचं आहे! आपलं लक्ष नेहमी आपण काय खातो याकडे असतं आणि आपण होणते द्रवपदार्थ पोटात ढकलतो याकडे आपण सपशेल दुर्लक्ष करतो. आज अनेक आरोग्यदायी द्रवपदार्थ उपलब्ध आहेत. पण ते आपण आहारात घेतो का? चहाबाबत काहीसं असंच नाही का? आपण रोज घेत असलेल्या चहाचे कोणकोणते प्रकार आहेत, आणि त्याचे फायदे-तोटे काय आहेत, याविषयी तुम्ही इतक्या सखोल माहिती घेतली नसेल, तर हे अवश्य वाचाच…
काळ्या चहापेक्षा (Black tea) चांगला चहा कोणता असणार? जरी त्यात कॅफेनचे प्रमाण जास्त असले तरी त्यात थिओफायलिन (Theophyllin) असते जे श्वासनलिकांना रूंद करते, तिथले रक्ताभिसरण वाढवते आणि हृदयविकार व पक्षाघाताचा धोका कमी करते. ते आपल्या फुफ्फुसांचे सिगारेटच्या व इतर प्रकारच्या धूरापासून संरक्षणही करते. काळ्या चहात आपण दूध आणि साखर देखील घालू शकतो.
काळ्या चहात सर्वाधिक कॅफेन असते आणि ते आरोग्यासाठी मुळीच चांगले नसते. हिरवा चहा (Green tea) हाच खरा उत्तम पर्याय आहे. त्यात असणारे EGCG (Epigallocatechin Gallate) नावाचे अँटीऑक्सिडंट आपल्याला विविध प्रकारच्या कर्करोगांपासून वाचवते, मन शांत करते आणि दातांचे किडण्यापासून संरक्षण करते.
“पिवळा चहा (Yellow tea) बाबत तुम्हाला काय वाटते? तो green tea सारखाच असतो पण त्याची चव जरा सौम्य असते. याचे फायदे green tea सारखेच आहेत. या चहामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा प्रतिबंध होतोच पण यकृतालाही संरक्षण मिळते.
आपण पांढऱ्या चहाची (White tea)निवड करू. त्यात कॅफेनचे प्रमाण तर सर्वात कमी असतेच, शिवाय त्यात जीवाणूप्रतिबंधक गुणधर्म असतात, यातील कॅटेकिन्समुळे कर्करोगाचा प्रतिबंध होतो, कोलेस्टेरॉल आणि उच्चरक्तदाब कमी व्हायला मदत होते, प्रतिकारशक्तीही वाढते. या चहामुळे त्वचाही तजेलदार होते. मग White tea का नको?”
White tea मुळे रक्त पातळ होते. तुम्ही घेत असलेल्या औषधांमधे तो ढवळाढवळ करतो. त्यामुळे मी ऊलॉंग चहा (Oolong tea) घेण्याचे सुचवेन. हा चीनमधील पारंपारिक चहा असून एका विशिष्ट पद्धतीने बनवला जातो. रक्तातील विशिष्ट प्रकारची चरबी (triglycerides) कमी करण्यासाठी हा चहा मदत करतो.ह्या प्रकारच्या चहामध्ये नायसिन नावाचे जीवनसत्व देखील असते जे शरीरातील दूषित घटक बाहेर टाकायला मदत करते आणि दात किडण्यापासून वाचवते.”
ऊलॉंग चहाची चव काही सर्वांना आवडत नाही… आंबवलेल्या चहाबाबत (Fermented Tea) तुमचे काय मत आहे? हा नैसर्गिकरित्या आंबवलेला असतो आणि याची चवही त्यामानाने सौम्य असते. कंबुचा हा अशाप्रकारचा चहा असून तो गेल्या हजारो वर्षांपासून वापरला जातोय. आंबवलेला असल्यामुळे त्यात आपल्या आरोग्यासाठी उत्तम असे मित्रजीवाणू (probiotics) आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, यांमुळे अनेक रोगांविरूद्ध लढण्याची ताकद आपल्यात येते. मला माहितीये, या प्रकारचा चहा सहजासहजी सगळीकडे मिळत नाही; पण आताशा बऱ्यापैकी मिळू लागलाय. हे वरील सर्व प्रकारचे चहा कमेलिया (Camellia) झाडाच्या पानांपासून बनवतात. वनौषधींचा चहा मात्र विविध औषधी वनस्पतींपासून बनतो आणि कॅफेनमुक्त असतो. त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत : रेबस (Rooibos) उर्फ लाल चहा, मॅटे (Mate), कॅममाईल (Chamomile) चहा इ. आपण आपल्या आवडत्या स्वादाचा चहा निवडू शकतो. या चहाचे अनेक फायदे आहेत.
1. मॅटे (Mate) चहा
आपला मूड चांगला करतो, पोट बिघडले असल्यास फायदेशीर ठरतो, श्वासाची दुर्गंधी घालवतो, ऍलर्जीचे प्रमाण कमी करतो. यात अँटिऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वाधिक असते (green tea च्या 4 पट). याची चव थोडीफार कॉफीसारखीच लागते!
2. रेबस (Rooibos) चहा
कर्करोगाविरूद्ध लढायला मदत करतो, यकृताच्या पेशींना नवसंजीवनी देतो, डोकेदुखी-निद्रानाश-अस्थमा, हाडांची ठिसूळता, उच्चरक्तदाब, ऍलर्जी, अकाली वृद्धत्व या सर्वांवर गुणकारी ठरतो. कॅफेन-टॅनिन यासारखे विषारी घटक यात नसतात.
3. कॅममाईल (Chamomile) चहा
मधुमेहाच्या दुष्परिणामांवर, कर्करोगावर, पोट व आतड्याच्या तक्रारींवर, निद्रानाशावर, तोंडातील जखमांवर (mouth ulcers) गुणकारी आहे.”
जरी चहा हे भारताचे राष्ट्रीय पेय म्हणून घोषित केले असले आणि सर्वाधिक घेतल्या जाणाऱ्या पेयांमध्ये पाण्याखालोखाल चहाचा नंबर असला, तरी जसे प्रत्येक चहाचे काही फायदे आहेत, तसे तोटेदेखील आहेत. आपण एक करूया, चहाचा तिसरा कप घेण्यापेक्षा एक ग्लास भरून पाणीच घेऊया!!”
1. काळा चहा- (Black Tea) –
कमेलिया (Camelia) झाडाच्या पानांपासून बनतो, कॅफेनचे सर्वाधिक प्रमाण, श्वासनलिकांना रूंद करून रक्ताभिसरण वाढवतो. हृदयविकार व पक्षाघाताचा धोका कमी करतो. आपल्या फुफ्फुसांचे सिगारेट व इतर प्रकारच्या धूरांपासून संरक्षण करतो.
2. हिरवा चहा – (Green tea) –
कमेलिया (Camelia)झाडाच्या पानांपासून बनतो – यात ECGC प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स असतात – कर्करोग, पार्किन्सन व अल्झायमर, पक्षाघात यांपासून संरक्षण. यातील फ्लुओराईडमुळे दातांचे किडीपासून संरक्षण
3. पांढरा चहा – (White Tea)
कमेलिया (Camelia) झाडाच्या पानांपासून बनतो, प्रक्रिया न केलेला, कॅफेनचे प्रमाण कमी, जीवाणूप्रतिबंधक गुणधर्म,कर्करोगाचा प्रतिबंध,कोलेस्टेरॉल आणि उच्चरक्तदाब कमी व्हायला मदत होते (रक्त पातळ होते),प्रतिकारशक्तीही वाढते. या चहामुळे त्वचाही तजेलदार होते
4. ऊलॉंग चहा – (Oolong tea) – कमेलिया (Camelia)झाडाच्या पानांपासून बनतो, वजन कमी करण्यासाठी उपयुक्त अशी जाहिरात केली जाते. रक्तातील triglycerides कमी करण्यासाठी मदत हाडांची शक्ती व प्रतिकारशक्ती वाढते, रक्तशर्करा नियंत्रणात रहाते.
5. आंबवलेला चहा (Fermented tea) –
उदा. कंबुचा (Kombucha), कमेलिया (Camelia)झाडाच्या पानांपासून बनतो. आरोग्यासाठी उत्तम असे मित्रजीवाणू (probiotics)आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, यांमुळे अनेक रोगांविरूद्ध लढण्याची ताकद मिळते
6. पिवळा चहा (Yellow tea) –
कमेलिया (Camelia) झाडाच्या पानांपासून बनतो, Green Tea सारखा असतो. कर्करोग आणि हृदयविकाराचा प्रतिबंध होतो, यकृताचे कार्य सुधारते.
7. वनौषधी असणारा चहा (Herbal Tea) –
1. मॅटे (Mate) – अर्जेंटिनामधील झाडपाल्यापासून बनवतात. अँटीऑक्सिडंट्सने परिपूर्ण, मूड चांगला होतो, पोट बिघडले असल्यास फायदेशीर,श्वासाची दुर्गंधी घालवतो,ऍलर्जीचे प्रमाण कमी करतो.
2. रेबस (Rooibos) – दक्षिण अफ्रिकेतील लालसर रंगाच्या झुडूपापासून तयार करतात. याला लाल चहा (Red Tea) असेही म्हणतात. यकृताच्या पेशींना नवसंजीवनी, कर्करोग, निद्रानाश, अस्थमा, उच्चरक्तदाब, ऍलर्जी, अकाली वृद्धत्व यावर गुणकारी
3. कॅममाईल (Chamomile) – कॅममाईल (Chamomile)झाडाच्या पानांपासून बनतो. मधुमेहाच्या दुष्परिणामांवर, कर्करोगावर, पोट व आतड्याच्या तक्रारींवर, निद्रानाशावर, तोंडातील जखमांवर (mouth ulcers) गुणकारी