राजगुरूनगर (प्रतिनिधी)- जागतिक एड्स दिनानिमित्ताने हुतात्मा राजगुरू महाविद्यालयातील रेड रिबन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या वतीने जागतिक विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जनजागृती रॅली, पथनाट्य, रांगोळी व निबंध स्पर्धा आदि विविध उपक्रमांचे घेत जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य डॉ. एच. एम. जरे, उपप्राचार्य, डॉ. व्ही. डी. कुलकर्णी, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.डॉ. संजय शिंदे, प्रबंधक कैलास पाचारणे, चांडोलीच्या ग्रामीण आरोग्य रुग्णालयातील समुपदेशक डॉ. शरद वाडिले, रोटरी क्लबचे अध्यक्ष नरेश हेडा, सुधीर येवले, राहुल वाळुंज, अविनाश कहाणे उपस्थित होते. ग्रामीण आरोग्य रुग्णालयात एचआयव्हीची मोफत तपासणी व उपचार केले जातात. या रोगापासून दूर राहण्यासाठीच्या उपायांची माहिती डॉ. शरद वाडिले यांनी दिली. यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली.
महाविद्यालय ते पंचायत समितीपर्यंतच्या जनजागृती रॅलीत स्वयंसेवकांनी वचन पाळा एड्स टाळा, जवान हू नादान नही, घटकेची मजा आयुष्याची सजा, रक्तदानामुळे एड्स होत नाही, मनमोकळे बोला एड्स टाळा. अशा घोषणा दिल्या. जागतिक एड्स दिनानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना विभागातील सुमारे 48 स्वयंसेवकांची एचआय व्ही एड्स चाचणी करण्यात आली. रांगोळी स्पर्धेत हर्षदा गोपाळे, कोमल बोराडे, मयुरी कोलंम, राजश्री कोळेकर यांचा प्रथम क्रमांक आला तर निबंध स्पर्धेत एड्स वर बोलू काही ही या विषयावर काजल फापाळे हिचा प्रथम क्रमांक आला. या विविध उपक्रमांचे आयोजन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. मच्छिंद्र मुळूक, प्रा. योगेश वाळूंज, प्रा. नीता डोंगरे, एन. सी. सी. प्रमुख मेजर प्रा. ए. बी. कानवडे यांनी केले.