पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रम बंद होणार!

पुणे (बालाजी पोटे) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश क्षमतेच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश झाले असतील, तर असे अभ्यासक्रम बंद करण्याची सूचना देण्यात आली आहे. त्यामुळे भाषिक अभ्यासक्रमांवर आणि मानव्यशास्त्र विभागातील अनेक अभ्यासक्रम बंद पडण्याची भीती आहे. त्याचे दूरगामी परिणाम होण्याची शक्‍यता शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

“शैक्षणिक विभागातील अभ्यासक्रमाची स्वयंपूर्णता तपासावी. प्रवेश क्षमतेच्या 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश असलेले अभ्यासक्रम राबवू नयेत. कोणत्याही अभ्यासक्रमांची प्रवेश क्षमता किमान 30 असायला हवी,’ अशा आशयाचे परिपत्रक विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी जारी केले आहे.

“विद्यापीठाच्या आर्थिक धोरणाशी हे परिपत्रक सुसंगत असले, तरी त्याचा शिक्षण क्षेत्रावर आणि मानवी जीवनावर होणाऱ्या परिणामांचा साकल्याने विचार केला गेला नाही,’ असे धुरिणांचे मत आहेत.

पुणे विद्यापीठात कित्येक वर्षांपासून अनेक विभाग व अभ्यासक्रमांना पूर्ण क्षमतेने प्रवेश झालेले नाहीत. त्यामुळे असे अभ्यासक्रम आता बंद होणार हे निश्‍चित आहे.

संस्कृत, पाली, हिंदी, मानव्यशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यास कक्ष यांसारख्या विभागांत बहुतांश अभ्यासक्रमांना 50 टक्‍क्‍यांपेक्षा कमी प्रवेश झाले आहेत. त्यामुळे या निर्णयाने हे विभागच बंद करण्याची वेळ प्रशासनावर येणार आहे.

काही विद्यार्थ्यांचे प्रवेश घटले
दरम्यान, कला शाखेच्या विषयांना प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या पुणे विद्यापीठात मोठी होती. यात अनेक विद्यार्थी हे हिंदी, पाली, संस्कृत, तत्त्वज्ञान अशा अभ्यासक्रमांना प्रवेश घेऊन स्पर्धा परीक्षेची तयारी करत असत. गेल्या अनेक वर्षांपासून हे प्रमाण अधिक राहिले आहे. परंतु, आता ऑनलाइन शिक्षणामुळे वसतिगृह, ग्रंथालय आदी सुविधा मिळत नसल्याने या विद्यार्थ्यांचेही प्रवेश कमी झाले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.

“स्किल डेव्हलपमेंट’कडे विद्यार्थ्यांची पाठ

विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण मिळावे, या दृष्टीने स्किल डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यात आले होते; परंतु या येथील कोणत्याही अभ्यासक्रमाचे प्रवेश पूर्ण क्षमतेने झालेले नाहीत. त्यामुळे येथील बहुतांश अभ्यासक्रम बंद होण्याची शक्‍यता आहे.

विभागअभ्यासक्रम प्रवेश क्षमतानिवड झालेले विद्यार्थी
संस्कृतएम.ए. लिंग्विस्टिक308
एम.ए. लॉजिक603
सर्टिफिकेट कोर्स301
पालीएम. ए. पाली3010
बुद्धिस्ट स्टडी209
हिंदीएम.ए. हिंदी प्रयोजनमूलक304
एम.ए. हिंदी साहित्य6032
परकीय भाषा रशियन भाषा10 1
स्पॅनिश भाषा205

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.