साउथ इंडस्ट्रीत डेब्यू करणार वरिना हुसैन

अभिनेत्री वरिना हुसैनने 2018मध्ये “लवयात्री’ चित्रपटातून बॉलीवूड करियरची सुरुवात केली होती. सलमान खानद्वारा प्रोड्यूस करण्यात आलेल्या या चित्रपटातून आयुष शर्माने देखील चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. यानंतर “दबंग-3’मधील “मुन्ना बदनाम हुआ’ या डान्स आइटममध्ये वरिना झळकली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain)

आता वरिना हुसेन दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत पर्दापण करण्याच्या तयारीत आहे. वरीनाने हा प्रोजेक्‍ट साइन केला आहे. साउथ इंडस्टीमधील एक प्रसिद्ध प्रोडक्‍शन हाउसद्वारा निर्मित चित्रपटात ती एका वेगळया भूमिकेत दिसणार आहे. हा एक तेलुगू चित्रपट असून यात वरिना मुख्य भूमिका साकारत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain)

या चित्रपटाचे शूटिंग सुरू करण्यासाठी वरिना पुढील महिन्यात हैदराबादला जाणार आहे. सध्या ती गोवा येथे शारिब हाश्‍मी आणि फ्रेडी दारूवाला यांच्यासोबत आपल्य आगामी “द इन्कम्प्लीट मॅन’च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. गोव्यातील शेड्यूल संपल्यानंतर ती साउथ चित्रपटाचे शूटिंगसाठी हैदराबादला जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by WARINA HUSSAIN (@warinahussain)

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.