नगर शहरातील सहा उमेदवारांच्या खर्चात तफावत

 24 तासात खुलासा करण्याचे आदेश

अहमदनगर: २२५ नगर शहर विधानसभा मतदारसंघ सोमवारी (दि १४) निवडणुक खर्च निरीक्षक दिक्षित यांच्याकडुन १२ उमेदवारांची निवडणुक खर्चाच्या वेळापत्रकानुसार खर्चाची दुसरी तपासणी पुर्ण करण्यात आली आहे.या तपासणीमध्ये ६ उमेदवारांच्या खर्च अहवालामध्ये खर्चामध्ये तफावत आढळुन आली आहे.

 • उमेदवाराचे नाव व तफावतीची रक्कम
 • अनिल रामकिसन राठोड (शिवसेना) – तफावत रक्कम-रु.122086.
 • बहिरनाथ तुकाराम वाकळे (भाकप) – तफावत रक्कम रु.7413.

   

 • श्रीपाद शंकर छिंदम (अपक्ष) – तफावत रक्कम रु. 1429.

   

 • मीर आसीफ सुलतान (एमआयएम) तफावत रक्कम रू. 5568.

   

 • श्रीधर जाखुजी दरेकर तफावत रू- 2288.
 • संदीप लक्ष्मण सकट तफावत रक्कम रु. 327O.

उपरोक्त ६ उमेदवारांना नोटीसा पाठवण्यात आल्या असून, योग्य त्या पुराव्यासह ४८ तासाच्या आत खुलासा सादर करण्याचे निर्देश निवडणूक विभागाने दिले आहेत. तसेच पुढील उमेदवारांची खर्चाची तपासणी १८ तारखेला होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.