वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार !

मुंबई: देशात ज्या ठिकाणी महाआघाडीचे उमेदवार नाहीत, तिथे जो योग्य उमेदवार असेल त्या उमेदवाराला मोदींच्या विरोधात ताकद देणार. शिवाय वाराणसीमधून मोदींच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांचा मिळून एकच उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकीचे वारे जोरात वाहू लागले आहेत. विरोधी नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना निवडणुकीत हरविण्यासाठी प्रयन्त सुरु केल आहेत. त्यामुळे लोकसभा निवडणूक चांगलीच रंगणार आहे.

दरम्यान, तामिळनाडूतील मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील शेतकऱ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार असलेल्या वाराणसी मतदारसंघातून तामिळनाडूतील 111 शेतकऱ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्याचे ठरवले आहे. तामिळनाडूतील शेतकरी नेते पी. अय्याकन्नू यांनी शनिवारी ही माहिती दिली. अय्याकन्नू हे “नॅशनल साऊथ इंडियन रिव्हर्स इंटर लिंकिंग फार्मर्स असोसिएशन’चे अध्यक्ष आहेत.

भाजपने आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये तामिळनाडूतील शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांचा समावेश करावा. त्यामध्ये शेतीमालाला किफायतशीर दर मिळण्याचाही समावेश आहे. या मागण्यांसाठी तामिळनाडूच्या शेतकऱ्यांनी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. तामिळनाडूतील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी 2017 साली दिल्लीमध्ये 100 दिवस आंदोलनही केले होते. ज्या दिवशी या मागण्या मान्य केल्याचे आश्‍वासन दिल्यास पंतप्रधान मोदींच्याविरोधात निवडणूक लढवण्याची योजना मागे घेतली जाईल, असे अय्याकन्नू म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.