‘या’ फोटोमुळे ‘वाणी कपूर’वर फिर्याद

मुंबई – अभिनेत्री वाणी कपूर ही चित्रपटसृष्टीतील बोल्ड अदाकारांपैकी एक आहे. ती फक्‍त बोल्ड लुकसाठीच नव्हे, तर चॅलेंजिंग भूमिका साकारण्यासाठीही ओळखली जाते. काही दिवसांपूर्वी वाणी कपूरने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर होता. मात्र, या फोटो मुळे वाणी वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. वाणीचा हा फोटो पाहून नेटकरी इतके संतापले कि, शेवटी वाणीला हा फोटो डिलीट करावा लागला.

वाणीचा हा फोटो पाहिला असता प्लाजो पॅटमध्ये असलेल्या साध्या लुकमध्ये दिसते. यासोबतच तिने टाई फ्रंट क्रॉप टॉप परिधान केलेला आहे, ज्यात डीप वी नेक तिचा हॉट अंदाज दर्शवितो. पण अचानक तिच्या या टॉपवर लिहिलेल्या अक्षरांवर काही युजर्सचे लक्ष गेले आणि ते भडकले. होय वाणीच्या या टॉपवर “हरे राम हरे कृष्णा” असं लिहिलेले होते.

ते पाहून अनेक लोक वाणीवर भडकले. काहींनी तिच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वाणीचा हा फोटो धार्मिक भावना दुखावणारा असल्याचा दावा अनेकांनी केला. टॉपचा हा वाद अंगलट येत असल्याचे पाहून वाणीने संबंधित फोटो आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून डिलीट करणे योग्य समजले.

दरम्यान, हे प्रकरण एवढ्यातच थांबले नसून आता, तर मुंबईत वाणीविरोधात पोलिस तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीत वाणीवर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. रमा सावंत यांनी एन एम जोशी मार्ग पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली. अद्याप वाणीने यासंदर्भात कुठलीही प्रतिक्रिया देखील दिलेली नाही.

 

View this post on Instagram

 

?

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

Leave A Reply

Your email address will not be published.