वाणी कपूर नव्या अवतारात

“वॉर’ या बहुचर्चित आणि बहुलोकप्रिय ठरलेल्या चित्रपटानंतर अभिनेत्री वाणी कपूर आता “शमशेरा’ या आगामी चित्रपटातून अभिनेता रणबीर कपूरसोबत रूपेरी पडद्यावर येणार आहे. वाणी आणि रणबीर पहिल्यांदाच या चित्रपटातून एकत्र झळकणार आहेत. या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर रणबीरसोबत काम करतानाचा अनुभव वाणीने शेअर केला आहे.

ती म्हणते, रणबीर हा बॉलीवूडमधला स्टार आहे. पण असे असूनही तो सेटवर अगदी सामान्य व्यक्‍तीप्रमाणे राहतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करण्याचा माझा अनुभव खूपच चांगला होता. आपण खूप चांगले चित्रपट केले आहेत, नाव कमावलं आहे याचा जराही दर्प रणबीरमध्ये मला कधीच दिसून आला नाही. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना कसलीच अडचण आली नाही. उलट रणबीरसोबत काम करत मी स्वतःला एक चांगला कलाकार बनवत आहे.

“शमशेरा’चे दिग्दर्शन करण मल्होत्रा करत आहेत. या चित्रपटात रणबीर कपूरचा डबलरोल असणार आहे, तर वाणी एका नव्या अवतारात असणार आहे. अशा प्रकारची भूमिका मी यापूर्वी कधीही केलेली नाही असे वाणी सांगते.

 

View this post on Instagram

 

Let it come. Let it go. Let it flow

A post shared by VK (@_vaanikapoor_) on

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)