वंदे मोहिमेमार्फत परदेशात अडकलेल्या 2 लाख भारतीयांना परत आणणार

नवी दिल्ली- विदेशात अडकलेल्यांना नागरिकांना आता मायदेशी परत येता येणार आहे. त्यासाठी केंद्राने वंदे मोहिम मिशन सुरु केले आहे. त्यासाठी भारतातून 60 विमाने बाहेर देशात पाठवण्यात येणार आहे.

12 विविध देशांमध्ये अडकलेले जवळपास 15 हजार भारतीयांना एअर इंडियाच्या विशेष विमानानं पुढच्या काही दिवसांमध्ये परत आणलं जाणार आहे.या प्रवाशांना प्रवास भाडं द्यावं लागणार असून भारतात पोहचल्यानंतर त्यांना 14 दिवस क्वारंटाईन व्हावं लागणार आहे. विमान आणि नौसेनेच्या जहाजांनी त्यांना परत आणण्यात येणार आहे.

त्यासाठी गरोदर महिला, जेष्ठ नागरिक आणि विद्यार्थांना प्राधान्य दिलं जाणार आहे. एका विमानात किमान 200 ते 250 प्रवासी असणार आहे. या मोहिमेचे नियोजन एअर इंडिया करत आहे. अमेरिका, यूके, सौदी अरेबिया, सिंगापूर, कतार आणि मलेशिया या देशांमध्ये भारत विमानं पाठवणार आहे. एकट्या दुबईत 1 लाख 97 हजार भारतीयांनी अर्ज केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.