Vande Bharat (बंगळुरू) : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रविवारी वंदे भारत स्लीपर ट्रेनच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली. ते बंगळुरू येथील भारत अर्थ मूव्हर्स लिमिटेडच्या (बीईएमएल) कारखान्यात ट्रेनची पाहणी करण्यासाठी आले होते.
त्यांनी सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेन येत्या 3 महिन्यांत सुरू होईल. कोचच्या निर्मितीचे काम पूर्ण झाले आहे. तो काही दिवसांत बीईएमएल कारखान्यातून बाहेर येईल. पुढील 2 महिने ट्रेनची चाचणी सुरू राहणार आहे. त्यानंतर ही ट्रेन प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेन 800 ते 1200किमी अंतर प्रवास करण्यासाठी तयार करण्यात आली आहे. ट्रेन मध्यमवर्गीयांसाठी बनवण्यात आली आहे. त्याचे भाडे राजधानी इतकेच असेल.